पसारा आवरता आवरता
फडताळात सापडले एक गाठोडे
मनात मात्र जुन्या
आठवणींचे काहुर उठले
जुने-पुराणे फाटके,विटलेले
तरी हि जपलेले
गाठोडे उघडताच
मन कधीच त्यात शिरले
हा बापडा शालु
अजुन ही तसाच तलम
नव्या नवरीच्या अंगावर
अगदी दृष्ट लागण्याइतका खुलला होता
चमकले ओठांवर, आठवणींचे हसु
अन् क्षणात डोळयांत झाले त्याचे आसु
ही शालजोडी त्यांच्या आवडीची
असंख्य प्रेमळ आठवणींची,करारीपणाची
भ्रताराची आठवण काळजात रुतली
जुन्या आठवणींवरची खपली निघाली
शेजारी कसलातरी भास झाला
अन् आपसुकच पदर सावरला गेला
शेजारीच पडले होते पायमोजे
बाळाची चाहुल लागताच विणलेले
दुपटी,कुंची-टोपडी,लंगोटी
अजुन ही गंधित होती
गाठोडयाच्या एका कोपरयात
निरागसपणे पडली होती
हे लुगडं सासुबाईंनी दिले होतं
आवडले म्हणुन जे मी म्हटलें होते
कसरीने त्याला प्रेमाने जपलेले
माझं वेडं मन हेलावून गेले
छोटे छोटे फ्रॉक ,अंगरखे
ने अजुन ही बरेच काही
आपलाच हा हट्ट काही-बाही
सुना-नातवंडाना जपलेले द्यायची
काळानुरुप सगळे बदलत गेले
जुने सर्व काही गाठोडयात गेले
आवरायचं म्हणुन पसारा काढला
नि मन त्याने चाळवले
पसारा आवरला तरी मनाला
सावरणे जमलं नाही
मग पुन्हा मी तसेच गाठोडं बांधलं
अगदी त्यात न गुंतता...
सोमवार, ६ एप्रिल, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
७ टिप्पण्या:
खूप सुंदररीत्या विचार व्यक्त केले आहेत. विजया वाड यांच्या ’गाठोडे’ या पुस्तकाची आठवण झाली. आपल्या व माझ्या विचारांमध्ये खूपच साम्य असल्याचं जाणवलं. लेखनासाठी अनेक शुभेच्छा!
Hey Kreative,
Thanks for lovely comment....Thanks for everything...
साम्य..नक्केच आवडेल मला तुमच्याशी बोलायला/गप्पा मारायला मग...
aata ithe marathit kasa lihayche?
deepa, nice blog :)
deepa!
nice blog! aata marathit kasa lihu?
:)
Aditya(Sandy..I ll prefer this name),
Thanks for ur wonderful comment...just ek look ,ojharate pahile tujhe profile..Oh my God, kiti blog aahet tujhe...Nivant baghin ekada...
Thik aahe Marathit type nahi keles tari Bhavana Pochalya..Thanks...
Sundar kavita keli ahes :)
Keep it up !!!
Thanks Aarti
टिप्पणी पोस्ट करा