मंगळवार, १३ ऑक्टोबर, २००९

जरा विसावु या वळणावर...


आम्हांला अमेरिकेत येऊन सप्टेंबर मध्ये एक वर्ष झालं...दिवस बघता बघता निघुन गेले....मागे बघुन वळायचं म्हटलं कि वाटतं किती हा मोठा काळ...काय केलो आपण गेले वर्षभर....?

एकदा ३ महिन्यांसाठी अमेरिकेचं धावत दर्शन घेऊन गेल्यानंतर मला वाटतं होते , पुन्हा जाऊ का आपण यु.स. ला?? अन् ती माझी इच्छा पुर्ण झाली.माझ्या स्वभावाप्रमाणे मी खुप काही उलाढाली , खटाटोपी केल्या इकडे आल्यावर...वेळ जावा म्हणुन, वेळ सत्कारणी लागावा म्हणुन...त्यातुन च नवीन गोष्टी शिकत गेले, खुप काही मिळाले. पण त्या बरोबरच घरच्यांना मिस केले ......ते तर आहेच...:(

पण ह्या गोष्टीतुन मिळणारा आनंद घेऊन मी परतणार आहे. अन् तो परत परत मिळवणार आहे....

मी इथे आल्यापासुन काय काय केले, शिकले हे मला खुप दिवसां पासुन लिहायचं होते. कारण मला वाटत कि त्याचा उपयोग नक्कीच कुणाला तरी होईल. घरापासुन दुर आहे म्हणुन दु:ख , वाईट वाटतं बसण्यापेक्षा हेच दिवस अविस्मरणीय, आनंदी करण्याचा काही ना काही मार्ग सापडेल.....!!!

ह्या फोल्डर मधल्या पोस्ट मध्ये माझे इथले अनुभव मी लिहीले आहेत...त्याचा तुम्हांला उपयोग झाला तर मला आनंदच होईल....