
मला एकदा मोगरयाचे फुल बनायचयं
गजरा होऊन तिच्या
वेणीत स्वतःला माळुन घ्यायचयं
वेणीत स्वतःला माळुन घ्यायचयं
मला एकदा झुळुक बनायचयं
गालाशी चाळा करणाऱ्या तिच्या
बटांना हळुच मागे सारायचयं
मला एकदा पाणी बनायचयं
तिच्या डोळयांच्या पापणीतुन
हळुच गालावर ओघळायचयं
मला एकदा मेघ बनायचयं
अचानक बरसुन तिला
अगदी चिंब भिजवायचयं
मला एकदा आरसा बनायचयं
तिला माझ्यात पाहताना
डोळॆ भरुन न्याहाळयचयं
मला एकदा सावली बनायचीय
आयुष्याभरासाठी तिला
साथ-सोबत करायचीयं
५ टिप्पण्या:
सुंदर कविता! आवडली मला!
अभिजीत,
धन्यवाद...
माझ्या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल तसेच अभिप्रायाबद्दल...
मनापासुन आभारी आहे...
सुंदर कविता आहे.... कविता आणि ब्लोग् ला दिलेला नाव दोण्ही आवडला..
Thanks Deepak...
I just gone thro ur blog..it's awesome...
hey Dipali,
thanks for your comments on my blogs... i am glad that u liked it.. u write very nice ... keep it up.. [:)]
टिप्पणी पोस्ट करा