
शाळेत असताना ९ वी ला कुसुमाग्रजाची ही कविता होती आम्हांला,"कणा".....मला खुप आवडली होती , अजुन ही आवडते...किती सोपी, छान पण खुप अर्थ असलेली....एखाद्या पुरग्रस्ताचे किती अचुक वर्णन केले आहे ह्यात...
त्याचा निर्धार, आत्मविश्वास वाखण्याणासारखा आहे....खुप काही शिकवुन जाते ही कविता...
कणा
"ओळखलांत का सर मला?" पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले नि केसावरती पाणी
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहुन,
गंगामाई पाहुणी आली गेली घरटयात राहुन
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळया हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणील घेऊन संगे सर आता लढती आहे,
पडकी भिंत बांधतो आहे,चिखल-गाळ काढतो आहे
खिशाकडे हात जातच हसत हसत उठला,
पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला
मोडला असला संसार जरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवुन नुसते लढ म्हणा
पाठीवरती हात ठेवुन नुसते लढ म्हणा
२ टिप्पण्या:
खुप दिवसांनी वाचायला मिळाली ही कविता... इथे पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद !!!
सतीश,
अभिप्रायाबद्दल व माझ्या लहानश्या ब्लॊग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद....
हो , मला ही कविता खुप आवडते...म्हणुनच पोस्ट करण्याचा खटाटोप....
तुमचा ब्लॊग ओझरता नजरेखालुन घातला...छान लिहिल आहे तुम्ही....नक्की पुन्हा भेट देईन....पुढील लिखाणासाठी शुभेच्छा......!!!
टिप्पणी पोस्ट करा