शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २००९

आठवेल का तुला?

कधीतरी मागे वळुन बघ आठवेल तुला काही
गेलेल्या क्षणांना हि पकडून ठेव सापडेल तुला काही

आठवेल का तुला आपलं पहिलं भेटणं
छोटयाश्या गोष्टीवरुन कडाक्याचं भांडणं होणं

मग काही ना काही कारणानं भेटत जाणं
कित्येक भेटीनंतर आपलं मन जुळणं

आठवेल का तुला गुलाबाचं फुल देताना सुटलेला कंप
तुझ्या हि चेहरयाचा त्यावेळी उडाला होता रंग

दुसरयाच क्षणी मात्र मनात कारंजे उडाले होते
तुझ्या हि गालावर असंख्य गुलाब फुलले होते

तु म्हणाली होतीस,फुलाची गरज नाहिये मला
हातात फक्त तुझा हात दे मला

आठवेल का तुला समुद्रात पाय पसरुन बसलेलं
लाटा चुकवुन वाळुचं घर बांधलेलं

आकाश्यातल्या चांदण्या मोजण्याची चढाओढ आठवेल का तुला
वारयांशी लावलेली पैज आठवेल का तुला

अन्‌ हातात हात घालुन उन्हांत चांदणं शोधायचो ते
रात्रीच्या अंधारात आयुष्याची स्वप्नं पाहयचो ते

आठवेल का तुला पोट धरुन हसताना डोळयांत पाणी यायचं
आणि डोळयांत पाणी आले असताना एकमेकाना हसवायचं

आठवेल का तुला आपलं ते जगणं
"मेड फॉर इच ऑदर" म्हणुन मित्रांचं चिडवणं

एवढं सगळं आठवताना मी आठवेन का तुला??
का जाणीवपुर्वक विसरुन जाशील तु मला???




२ टिप्पण्या:

आशा जोगळेकर म्हणाले...

फारच छान, अगदी अनुभवलेलंसं.

Dipali म्हणाले...

आशा, धन्यवाद...
माझ्या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल तसेच अभिप्रायाबद्दल...
मनापासुन आभारी आहे...